सोने आयातीत वाढ 

नवी दिल्ली: देशाची चालू खात्यावरील तूट वाढत असूनही सोन्याची आयात करण्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 2017-18 या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 22.31 टक्‍क्‍यांनी वाढ होत 33.65 अब्ज डॉलर्सवर पोहोचले असे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समजते. 2016-17 या आर्थिक वर्षात सोन्याची आयात 27.51 अब्ज डॉलर्सची होती. 2015-16 मध्ये हा आकडा 31.7 अब्ज डॉलर्सची होती.
चालू खात्यावरील तूट ही विदेशी चलनाच्या आयात आणि निर्यातीतील फरकावर अवलंबून असते. 2017-18 मध्ये ते जीडीपीच्या 1.9 टक्के म्हणजेच 48.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. 2016-17 मध्ये ती 14.4 अब्ज डॉलर्स होती.
सोन्याची आयात वाढल्याने त्याचा परिणाम व्यापारी तुटीवर दिसून आला. गेल्या आर्थिक वर्षात या तुटीत 45 टक्‍क्‍यांनी वाढ होत 157 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मात्र जानेवारीपासून सोन्याच्या आयातीमध्ये घट दिसून येत आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी भारतात सुमारे 700 ते 800 टन सोन्याची आयात करण्यात येते. वाढती व्यापारी तूट आणि चालू खात्यावरील तूट पाहता सोने आयात कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलण्यात आली आहेत. दक्षिण कोरियातून करमुक्त सोने आयातीवरील मर्यादा हटविण्यात आली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)