जम्मू-काश्‍मीरमध्ये अपहरण करुन नागरिकाची हत्या

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाचे अपहरण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही हत्या दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे करण्यात आली. मनजूर अहमद असे हत्या करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार गुरुवारी रात्री घडला. प्राथमिक तपासात जबरदस्ती त्यांना घरातून बाहेर नेत गोळ्या घालून ठार केले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांत सामान्य नागरिकावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.उच्च माध्यमिक शाळेजवळ मनजूर यांचा मृतदेह सापडला. मनजूर अहमद यांचा जागीच मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)