महामार्ग दुभाजकाचा कचरा गावच्या जलस्त्रोत्रात

महामार्ग प्राधिकरणाचा अजब कारभाराने संताप
 
महामार्गावरील दुभाजकाची साफसफाई सुरु असून साफ केलेला कचरा गावच्या जलस्त्रोत्रात टाकला जात आहे.महामार्ग प्राधिकरणाच्या या अजब कारभाराने संताप व्यक्त केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाद्वारा सुरूर ते आनेवाडी टोलनाक्‍याच्या दरम्यान दुभाजकातील कचरा काढण्याचे काम सुरु केले असून यामध्य अनावश्‍यक वाढलेले व सद्यस्थितीत वाळून गेलेले गवताचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

याचबरोबर एरंड व महाडुंग यासारखी झाडे झुडपे सुद्धा या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती . त्यामुळे स्वस्तात मस्त असलेली कागदी फुलाची शोभेची झाडे मात्र या अनावश्‍यक झुडपांच्यामध्ये झाकून गेली होती. हे दुभाजक स्वच्छ केले गेल्याने पुन्हा एकदा या कागदी फुलांच्या झाडांचे फुलांच्यासह अस्तित्व दिसू लागले आहे. आत्ता उन्हाळा येत असल्याने हि साफसफाई झाल्यावर गतवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात हि झाडे जागविण्यासाठी पाण्याचे टॅंकरने पाणी घालून हि झाडे पुढच्या पावसाळ्यापर्यंत जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा कचरा साफ करताना मात्र सरासरी दोनशे मीटर अंतरातच एक ट्रॉलीभर कचरा निघत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा कचरा टाकायचा कुठे ? हा प्रश्न निर्माण झाल्याने जिथे जागा मिळेल तिथे आडबाजूला हा कचरा टाकला जात आहे. कवठे ता. वाई येथील खते-याच्या पुलाच्या शेजारी असलेल्या ओढ्यात हा कचरा टाकला गेला आहे.

या ठिकाणी गावाच्या ओढ्यात हा कचरा टाकला गेल्याने त्यांचे पुढे काय दुष्परिणाम होतील याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी न घेता हा कचरा टाकून दिला जात आहे. कवठे येथील ओढ्यात टाकलेला हा कच-याचा ढीग उद्या पावसाबरोबर वाहत खाली जाणार असून या ठिकाणापासून खाली ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्या लागत याचे प्रदूषण होणार आहे. या ठिकाणापासून खाली तीन साखळी बंधारे असून त्यामध्ये सुद्धा सदर कचरा कुजून जाण्याची शक्‍यता आहे.

या कच-याचे प्रदूषण होऊन याचा आमच्या गावच्या पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम होणार आहे. महामार्ग चकाचक करून गावाच्या जलस्त्रोतात हा कचरा टाकून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाला कोणताही अधिकार नाही . तरी त्यांनी तातडीने सदर कचरा उचलावा. संदीप डेरे, उपसरपंच कवठे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)