महामार्गालगतचे बार पुन्हा सुरु होणार 

मुंबई – राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दुकाने पुन्हा सुरु होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१७ पासून महामार्गालगतच्या दारू दुकानांवर बंदी आणली होती. परंतु, राज्य शासनाने आता यावरील निर्बंध शिथिल करत नवीन निकष लागू केले आहेत.

याआधी पाच हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात दारूची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी होती. परंतु, राज्य शासनाच्या नव्या निकषानुसार आता तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्येही दारूविक्री करता येणार आहे. या नव्या निकषामुळे तळीरामांना, दारुविक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दुकाने अनधिकृत सुरु होती. ही दुकाने आता परवाना शुल्क भरून अधिकृतपणे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतही मोठी आर्थिक भर पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. परंतु, २०१७ मध्ये आपल्या आदेशात बदल करत सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर महामार्गालगतची दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)