विमानतळांवर हायअलर्ट : प्रवासी वाहतूक बंद 

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. या पार्श्वभूमीवर लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी केला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद करण्यात आले आहे. पंजाबमधील अमृतसर विमानतळावरून होणारी विमान वाहतूकही थांबविण्यात आली आहे. उत्तराखंडस्थित देहरादून येथील वाहतूकही थांबविण्यात आल्याचे समजते आहे. भारत-पाकिस्तान देशांमधून जाणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत झाली असून काही विमाने पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान,पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद विमानतळावरुन होणारी विमान वाहतूक थांबवली आहे.

https://twitter.com/ANI/status/1100652809517780992

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)