भारतात सर्वात श्रीमंत पक्षाच्या यादीत ‘बसपा’ अव्वलस्थानी, तर भाजप, काँग्रेस ‘या’ क्रमांकावर…

नवी दिल्ली – निवडणुका म्हटलं की, याकाळात उमेदवारांची संपत्ती, राजकीय पक्षाकडे असलेला निधी यांची सर्वात जास्त चर्चा होते. निवडणुकीचे अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रांमुळे संबंधित उमेदवारांची संपत्ती किती आहे याबाबतची माहिती सर्वांना मिळते. पण आता कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत नुकताच एक अहवाल जारी केला आहे. देशातल्या सगळ्यात राजकीय पक्षांनी आपल्याकडच्या पैशांचा हिशोब 25 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार भाजप नव्हे तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे बाकी कोणत्याही पक्षापेक्षा जास्त निधी असल्याची माहिती समोर आली आहे. मायावतींच्या बसपाचा बँक बॅलन्स 669 कोटी रुपये आहे. त्यासोबतच एक कोटी रुपयांची रोकड आहे. बसपाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या माहितीनंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

यादीत दुसऱ्या नंबरवर समाजवादी पक्ष आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत बसपासोबत युती केलेल्या समाजवादी पक्षाचा विविध खात्यातील बँक बॅलन्स 471 कोटी रुपये आहे.

या यादीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यात 196 कोटी रुपये आहेत. ही आकडेवारी कर्नाटक निवडणुकांनंतर सादर झालेल्या अहवालावर आधारित आहे.

तर यादीत काँग्रसनंतर तेलुगु देसम पक्षांचा काँग्रेसनंतर नंबर लागतो. तेलुगु देसम चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे बँक बॅलन्स 107 कोटी रूपये आहे.

आश्चर्य म्हणजे या यादीत अमित शाह अध्यक्ष असलेला भाजप पाचव्या क्रमांकावर आहे. भाजपकडे 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. भाजपच्या दाव्यानुसार 2017-18 मध्ये मिळालेल्या 1027 कोटींपैकी 758 कोटी रुपये पक्षाने खर्च केले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)