मुदत ठेवीवर पेमेंट बॅंकांकडून जास्त व्याज 

मुंबई  –फिक्‍स डिपॉझिट अर्थात मुदत ठेवींवर बहुतांश मध्यमवर्गीयांचा आजही विश्वास आहे. परंतु, बऱ्याच बॅंकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याज जेमतेम सहा टक्‍क्‍यांवर आलंय. एफडी मोडली तर त्याचे शुल्क कापले जाते. तरीही, बरेच जण एफडी करतात आणि बचत खात्यापेक्षा थोडे अधिक व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींसाठी पेमेंट बॅंका अधिक व्याज देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार पेटीएम पेमेंट्‌स बॅंकेने एफडीवर आठ टक्के व्याज देण्याचं जाहीर केलंय. त्यासोबतच, एफडी मोडावी लागली, तर खात्यात ठेवलेले पैसे निःशुल्क काढण्याची सुविधाही ते देत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीला चालना देण्याचा त्यामागे उद्देश आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेला करार पेटीएमने इंडसइंड बॅंकेसोबत केला आहे. त्यामुळे नियमांच्या अधिन राहून इतर पेमेंट बॅंकाही अशी सेवा सुरू करण्याची शक्‍यता असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)