जर्मनीत जलदगती रेल्वेला आग

बर्लिन: जर्मनीमध्ये आज एका जलदगती रेल्वेला आग लागल्याने रेल्वेचे दोन डबे आगीत भस्मसात झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की जर्मनी येथील कोलोगने येथून मुनीच कडे जाणाऱ्या आयसीई जलदगती रेल्वेमध्ये पोलीस दलात काम करणाऱ्या एका इसमाला रेल्वेमध्ये ‘जळल्यासारखा वास’ आल्याने त्याने इमर्जन्सीचे बटन दाबत रेल्वे थांबवली.

-Ads-

सदर इसमाच्या चालाखीमुळे रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या ५१० प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)