अतिउच्चदाब उपकेंद्रे बंद पडल्याने शहरात बत्ती गूल

पुणे – महापारेषण कंपनीच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील 220 केव्ही व 132 केव्ही क्षमतेचे 29 अतिउच्चदाब उपकेंद्रे बंद पडले. परिणामी, पुणे शहरातील प्रामुख्याने नगररोड, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, गणेशखिंड, शिवाजीनगर, औंध, मगरपट्टा, खराडी, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, वाघोली, हडपसर, बंडगार्डन, कोथरूड, वाकड, वारजे, पाषाण, बावधन, सुस रोड, कोंढवा, कात्रज आदी भागांचा वीजपुरवठा एका तासापर्यंत खंडित होता.

लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी 1.06 वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या उपकेंद्रातून वीजपुरवठ्यासाठी अवलंबून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या तब्बल 29 उपकेंद्रांचा सुद्धा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये 400 केव्ही लोणीकंद, चाकण उपकेंद्र तसेच 220 केव्ही भोसरी, चिंचवड, टेल्को, चाकण इंडस्ट्रीयल फेज टू, वॉक्‍सवॅगन, ब्रीजस्टोन, महिंद्रा, थेऊर, फुरसुंगी, सेरम, मगरपट्टा, रांजणगाव आणि 132 केव्हीचे मुंढवा, गणेशखिंड, एनसीएल, अंबेठाण, मरकळ, सणसवाडी, या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापारेषणकडून युद्धपातळीवर प्रयत्न करून लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्राचा खंडित वीजपुरवठा 23 मिनिटांनी पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महापारेषणचे उर्वरित सर्वच 28 अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरु करण्यात आला. त्याप्रमाणे महावितरणचेही सर्वच उपकेंद्रे सुरु झाले व वीजपुरवठा सुद्धा पूर्ववत सुरळीत झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)