दीर्घ तणावानंतर चीन आणि अमेरिकेत उच्चस्तरीय चर्चा 

वॉशिंग्टन (अमेरिका) – अनेक महिन्यांच्या दीर्घ तणावानंतर चीन आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय चर्चा आज सुरू होत आहे. व्यापारापासून ते लष्करी समस्यांपर्यंत अनेकविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न या चर्चेद्वारे करण्यात येणार आहे. अर्जेंटिनामध्ये होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची शक्‍यता असण्याच्या काळात ही चर्चा सुरू होत आहे. या चर्चेतून काहीतरी सकारात्मक साध्य होईल अशी दोन्ही पक्षांची अपेक्षा आहे.

शुक्रवारी सकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉंपिओ आणि संरक्षण मंत्री जिम मॅटिस चीनच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. गेल्या आठवड्यातच चीनबरोबर वाढत्या लष्करी तणावामुळे जिम मॅटिस यांनी आपली नियोजित चीन यात्रा रद्द केली होती. मात्र आता चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फॅंग चर्चेत सहभागी होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)