असोसिएटेड जर्नल लिमिटेडला हायकोर्टाचा दिलासा 

नॅशनल हेरॉल्डच्या जागेबाबत 22 नोव्हेंबर पर्यंत “जैसे थे’ 

नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्डची प्रकाशन संस्था असलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड या संस्थेला आज उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. नॅशनल हेरॉल्ड वर्तमानपत्राची इमारत सोडण्याबाबत “एसोसिएटेड जर्नल लिमिटेड’ला केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांना 22 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी 22 नोव्हेंबरपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

-Ads-

नॅशनल हेरॉल्डच्या इमारतीबाबतचा 56 वर्षांचा करार संपुष्टात आल्यामुळे केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने “असोसिएटेड जर्नल लि.’ला जागा रिकामी करण्याचे आदेश 30 ऑक्‍टोबर रोजी दिले होते. त्या आदेशांना “असोसिएटेड जर्नल लि.’ने 12 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने हे आदेश देशातील वंचितांचा आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा (कॉंग्रेस) आवाज दाबण्यासाठीच दिले असल्याचा दावाही “असोसिएटेड जर्नल लि.’ने केला होता. सत्तारुढ भाजपने दिलेले हे आदेश जाणीवपूर्वक हे पक्षपाती आदेश दिल्याचा आरोपही याचिकेत केला होता. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)