अल्पवयीन बलात्कार पीडीत मुलीला हायकार्टाचा दिलासा

24 आठवड्याच्या गर्भपाताला परवानगी

मुंबई: अल्पवयीन बलात्कार पीडीत मुलींला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुलीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होवू नये म्हणून 24 आठवड्याच्या गर्भपाताला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला. सदर आरोपीला पॉक्‍सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आले. दरम्यान ही मुलगी गर्भवती राहिली. ती 24 आठवड्याची असल्याने एमटीपी कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही, म्हणून परवानगी मिळावी म्हणून पिडीत मुलीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी जेजे हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचा बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेत पिडीत अल्पवयीन मुलीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून गर्भपात करण्याची परवानगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)