एमएसआरडीसीला हायकोर्टाचा दिलासा

वांद्रे वर्सोवा सिलींकसाठी 3 हेक्‍टर्सवरील कांदळवने तोडण्यास परवानगी

मुंबई : कांदळवनांची तोड करावी लागणार म्हणून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वांद्रे वर्सोवा सिलींकचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने वांद्रे वर्सोवा सिलींकसाठी 2.99 हेक्‍टर्सवरील कांदळवने तोडण्यास परवानगी दिली. ही झाडे तोडण्यापूर्वी सीआरझेड, वनविभाग व इतर प्राधिकरणांकडून आवश्‍यक त्या परवानग्या घ्या. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आठवडाभरात न्यायालयात सादर करा, असे आदेशही खंडपीठाने एमएसआरडीसीला दिले.

वांद्रे-वर्सोवा सिंलींकच्या प्रकल्पासाठी 2.99 हेक्‍टर्स जागेवरील कांदळवने तोडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका एमएसआरडीसीने हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी एमएसआरडीसीच्या वतीने युक्तीवाद करताना ऍड. मिलींद साठे आणि ऍड. साकेत मोने यांनी राज्य सरकारचा हा प्रकल्प जनहितार्थ असून वांद्रे वर्सोवा सिलींकमुळे पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याने कांदळवने तोडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)