विजयपथ सिंघानिया यांना हायकोर्टचा दणका

 तूर्तास आत्मचरित्र प्रकाशित करण्यास मनाई 13 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती रेमंड्‌स समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांना हायकोर्टने धक्का दिला आहे. त्याच्या “द इनक्‍प्लिलट मॅन’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला 13 मार्चपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. दक्षिण मुंबईतील जे. के. हाऊस या मालमत्तेवरून विजयपत सिंघानिया आणि त्यांचे पुत्र रेमंड्‌स समूहाचे विद्यमान अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्यामध्ये कोर्टबाजी सुरू आहे. यादरम्यान विजयपत सिंघानियांचे हे आत्मचरित्र प्रकाशनाच्या मार्गावर असल्याने गौतम सिंघानिया यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनावर स्थगिती आणण्याची मागणी करीत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

तर हा खटला ठाणे जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी याचिका विजयपत सिंघानिया यांनी केली आहे. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी गौतम सिंघानिया यांच्यावतीने “द इनक्‍प्लिलट मॅन’ या आत्मचरित्राला जोरदार आक्षेप घेतला. विजयपत सिंघानिया यांनी आपली जीवन कहाणी मांडली आहे. मात्र त्यातील काही मजकूर हा आपली आणि पर्यायाने रेमंड्‌स समूहाची बदनाम करणारा आहे, असा दावा करून पुस्तक प्रकाशन करण्यास मनाई करावी, अशी विनंती केली. याची दखल घेत न्यायालयाने याचिकेची सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब ठेवली. तोपर्यंत पुस्तकाचे प्रकाशन करण्यास तूर्त मनाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)