राफेल खरेदीतील निर्णय प्रक्रियेची माहिती सादर करा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
नवी दिल्ली: राफेल विमाने खरेदी प्रकरणात सरकारने त्यांच्या निर्णय प्रक्रियेची माहिती सीलबंद पाकिटात न्यायालयात सादर करावी अशी महत्वपुर्ण सुचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. आम्हाला या विमानांच्या किंमती आणि त्यांच्या तांत्रिक तपशीलाची माहिती नको आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्या रंजन गोगोई, न्या एस. के कौल आणि न्या के. एम जोसेफ यांच्या खंडपीठाने आज एका जनहित याचिकेवर सुनावणी घेताना केंद्र सरकारला हा आदेश दिला. या प्रकरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची आम्ही दखल घेतलेली नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या वतीने या याचिकेलाच जोरदार आक्षेप घेण्यात आला. राजकीय हेतूने ही याचिका सादर करण्यात आली असल्याने ती फेटाळण्यात यावी अशी मागणी सरकारच्यावतीने आज न्यायालयात करण्यात आली. न्या के के वेणुगोपाल यांनी सांगितले की हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत असून त्याचा न्यायालयात आढावा घेता येणार नाही. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारला कोणतीही नोटीस न बजावता केवळ त्यांच्याकडून या खरेदीच्या निर्णय प्रक्रियेची माहिती मागवली आहे.
राफेल खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा झाला असून त्याची कोर्टाच्या देखरेखेखाली चौकशी करावी अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका दोन वकिलांच्यावतीने न्यायालयात करण्यात आल्या आहेत. येत्या 29 ऑक्‍टोबरच्या आत केंद्र सरकारने ही माहिती सादर करावी अशी सुचना न्यायालयाने केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 ऑक्‍टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)