पुण्यातील लष्करी यंत्रणांना ‘हायअलर्ट’

पोलिसांनी शहरातील सुरक्षेत केली वाढ

पुणे – भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन जैश-ए-मोहंमदचा मुख्य प्रशिक्षण तळ उद्‌ध्वस्त केला. यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली, यामध्ये जशास तसे उत्तरे देण्याचा पवित्रा घेण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर देशातील लष्कर “अलर्ट’ झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहरात लष्कराचे देशातील सर्वांत मोठे मुख्यालय व हवाई दलाचा तळ आहे. येथील यंत्रणाही मंगळवारी सज्ज करण्यात आली. मंगळवारी सकाळपासून हवाई दलाच्या तळावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू होत्या. लष्कराची यंत्रणा हवाई तळावर हलवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

पुणे शहरात लष्कराचा सर्वात मोठे मुख्यालय (दक्षिण कमांड) आहे. तसेच अॅम्युनेशन फॅक्‍टरी, आयुध निर्माण संस्था, संशोधन संस्था, प्रशिक्षण संस्था, हवाल दलाचा तळ, लष्करी रुग्णालय अशा महत्वांच्या संस्था आहेत. यामुळे लष्कराच्या दुष्टीने पुणे शहर महत्त्वाचे आहे. बालकोटामध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर तसेच पाकिस्तानने घेतलेल्या पवित्र्यानंतर लष्कराला “हाय अलर्ट’ देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे लष्कर सर्वच स्तरावर सज्ज ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील लष्करी संस्थांही सज्ज झाल्या आहेत. लष्कराने मदत मागितल्यावर शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी लष्कराच्या मदतीला पाठविण्यात आले होते. लष्कराची यंत्रसामग्री हवाई तळावर हलवण्याच्या कामी पोलिसांची मदत घेण्यात आली.

यासंदर्भात माहिती देताना पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “लष्कराने मागितलेल्या मदतीनुसार पोलिसांची मदत त्यांना पुरवण्यात आली. लष्कराची यंत्रसामग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. तर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नेहमीच्या तुलनेत पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)