राज्यात हाय अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

मुंबई – भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातच आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबईच्या पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. स्टॉक मार्केट आणि जगभरातल्या प्रमुख कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईची सुरक्षा व्यवस्थेला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातेय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट, बनासकांठा, भोपाळ, धरमशाला हवाई तळांवरही अलर्ट जारी करण्यात आला असून आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)