स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हायअलर्ट

दिल्ली – देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गुप्तखात्याकडून आलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा आणि काश्मीरी आंतकी संघटना दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करू शकतात. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली मध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही आंतकवादी दिल्लीमध्ये लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. बाजारातील गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दिल्ली पोलिस मधील मोठे अधिकारी सुध्दा आपल्या टीमसोबत स्वत: देखरेख करत आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये मोठ-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारतीय झेंडा फडकवितात आणि देशाला संबोधित करतात. यावेळी देशातील सर्व मोठे नेते, प्रमुख व्यक्ती याठिकाणी उपस्थित असतात. अनेक नागरिक, विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दिल्ली पोलिस आणि सुरक्षादल यांच्या टीम दिल्लीमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)