गुजरामध्ये “हाय अलर्ट’ : आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणांचा इशारा

अहमदाबाद – गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्‍स, रेल्वे स्थानकं, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात हैदराबादमधल्याच एकाचा समावेश आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उडविण्याची धमकी
गुजरातच्या नर्मदा जिल्हातील सरदार वल्लभभाई पटेल म्हणजेच “स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचे एका ईमेलद्वारे समोर आले आहे. ईमेलद्वारे “स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह गुजरातमधील तीर्थस्थाने आणि रेल्वे स्टेशन्सवर हल्ला करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या ईमेलची गंभीर दखल घेत अहमदाबाद क्राईम ब्रान्च आणि ऍन्टी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) ला याबाबत तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ईमेलची सत्यता पडताळली जाणार आहे. दरम्यान, या ईमेलनंतर नर्मदेच्या तीरावर असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहोम्मद संघटनेशी संबंधित असलेल्या या आरोपीची पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये भूमिका होती. आरोपीबरोबर एका वृद्ध महिला असून दोघांची रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याची योजना आहे, असे या अहवालात म्हटले आहे. आदिल अहमद दारने त्याच्या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिल्ली, गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचा उल्लेख केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हाय अलर्ट घोषित केल्यानंतर गुजरात आणि आसपासच्या भागातील प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम्स बनवण्यात आल्या आहेत. किनारपट्टी आणि पाकिस्तान सीमेला लागून असणाऱ्या भागात गुजरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)