संपूर्ण देशात नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन(एनआरसी) प्रक्रिया होण्याची गरज – हिमांता बिस्वा सरमा 

अगरतळा – आसामचे वित्तमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी आज बोलताना असे सांगितले की, राज्यातील वैध नागरिकत्वाचा मसुदा पुन्हा तयार करणे हे काही मोठी बाब नाही. हिमांता हे भारतीय जनता पार्टी आणि स्थानिक पक्ष एकत्र येऊन तयार केलेल्या नेडा(NEDA) मध्ये संयोजक होते.

सरमा आणि ईशान्य भारतातील अन्य काही भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन (एनआरसी) याबाबतच्या मसुद्याचे फक्त ४० टक्के काम झाल्याने  काही जबाबदार मते देण्याचे टाळले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यात एनआरसी  बाबतच्या अश्या काही मागण्यांबद्दल काही माहिती नसल्याचे म्हणाले.
हिमांता बिस्वा सरमा या आयोजित कार्यक्रमात म्हणाले, ” सध्यातरी आसाममध्ये  एनआरसीबाबत कुठलाच मुद्दा नाही. हा मसुदा असून हे अंतिम यादी नाही. त्या यादीत अनेकांची नावे नाहीत . त्यांच्या संख्येमुळे  खूप गोंधळ झाला आहे. फेरतपासणी नंतर या संख्येत खूप घट दिसेल.
“असामला एक  सुधारित आणि परिपूर्ण एनआरसी तयार करू दया  त्यानंतर संपूर्ण देशात देखील याची पुनरावृत्ती होईल. खरे तर संपूर्ण देशात नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन प्रक्रिया होण्याची गरज आहे.” हिमांता बिस्वा सरमा असे ही  पुढे बोलताना  म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)