कृषिमित्र बनून शेतकऱ्यांना मदत करा

भोर – भोर तालुका हा डोंगरी तालुका असून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच अनेकवेळा बैठका घेऊनही परिस्थिती “जैसे थे’ आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बळीराजा त्याचे हक्‍काचे आहे तेच मागत असतो. महसूल, कृषी, महावितरण, पंचायत समिती आणि अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कृषिमित्र बनून काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केले.

राज्य सरकारचा कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि भोर तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाणे पंचायत समितीच्या सभागृहात खरिप हंगाम 2019-20च्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी देवकाते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, तहसीलदार अजित पाटील, गट विकास अधिकारी संतोष हराळे, उपविभागीय कृषी अधिकारी सीनिल खैरनार, जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे, माजी उपसभापती अमोल पांगारे, जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे, रणजीत शिवतरे, शिवरंजन पाटील, माजी सदस्य कुलदिप कोंडे, पंचायत समितीचे सदस्य लहू शेलार, दमयंती जाधव, महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी नारायण साळुंके, नथू मांढरे, अनिल बांदल, महेश धुमाळ, भरत शिवतरे, रामचंद्र शिवतरे यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख म्हणाले की, तालुक्‍यातील खरीप हंगामातील भात, नाचणी, भुईमूग, कधान्ये आदी पिकांची 16 ते 17 टक्‍के लागवड झाली आहे. बियाणे व खते यांची 71 टक्‍के मागणी पूर्ण झाली आहे. यंत्राद्वारे भात लागवड केल्यास उत्पादन दुप्पटीने वाढते. या तालुक्‍यात 300 एकरात ही मशिनद्वारे भात लागवड करण्यात येत आहे. लहू शेलार म्हणाले की, भात शेती तोट्याची असली तरी करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी कृषी विभागाने शेतकरी समन्वय बैठका घेणे गरजेचे आहे. यांत्रिक भात लागवड केल्यास कमी कष्टात व खर्चात पीक
घेता येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)