पणजी – एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा प्रसंग आज गोव्यातील काबो दे रामा समुद्र किनाऱ्यावर घडला. गोव्यातील काबो दे रामा समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेला एक वीस वर्षीय तरुण आज उंच उसळलेल्या लाटेमुळे लाटेसह समुद्रात वाहून गेला. या दुर्घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर घटनास्थळी हजर झाले.
लाटेसोबत समुद्रात २ नॉटिकल मैल वाहून गेलेल्या सदर तरुणाचा तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरद्वारे शोध घेत त्याची रेस्क्यू रोपच्या सहाय्याने सुटका केली. तरुणाची स्थिती सध्या स्थिर असून तटरक्षक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच सदर तरुणाचे प्राण वाचू शकले आहेत अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
#WATCH Indian Coast Guard rescued a man from drowning, 2 nautical miles North of Cabo de Rama beach, Goa, earlier today. The survivor in his early 20s was swept away by ebbing waves from the beach and is now stable. pic.twitter.com/IX9Gs03WG2
— ANI (@ANI) June 13, 2019