#चिंतन: नैतिक उंची (भाग १)

डॉ. दिलीप गरूड 
पुण्यामध्ये प्रा. ग. प्र. प्रधान नावाचे थोर समाजवादी विचारवंत होऊन गेले. त्यांचे पूर्ण नाव गणेश प्रभाकर प्रधान. पण सर्वजण त्यांना प्रेमाने “प्रधान मास्तर’ असंच म्हणत. ते खरं म्हणजे मराठी शाळेवर मास्तर म्हणून काम करत नव्हते; तर चांगले फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. पण तरीही त्यांना प्रधान मास्तर ही उपाधी मिळाली ती मिळालीच. ज्याप्रमाणे साने गुरुजी अमळनेरच्या प्रताप हास्कूलमध्ये “सर’ म्हणून काम करत होते तरी सर्वजण त्यांना प्रेमाने गुरुजीच म्हणत. तसंच प्रधान मास्तरांचंही झालं होतं.
प्रधान सरांचा जन्म गणेश चतुर्थीला झाला होता. म्हणून त्यांच्या आईने त्यांचे नाव लाडाने गणेश असे ठेवले होते. प्रधान सरांचा वेश साधाच असे. पांढरा शुभ्र पायजमा, अंगात पांढराच सदरा, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, त्या चष्म्याआड मोठमोठे डोळे, चेहऱ्यावर सतत लहान मुलासारखे निरागस हसू, गौर वर्ण, डोक्‍यावरचे केस विरळ झालेले, सडसडीत देहयष्टी, पायात साध्याच वहाणा; असे प्रधान सरांचे रूप होते.
पुढे कॉलेजची नोकरी सोडून प्रधान सर स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. त्यांना कारावास भोगावा लागला. तुरुंगात साने गुरुजींच्या बरोबर राहण्याचा त्यांना योगही आला. एवढंच नव्हे, तर साने गुरुजींनी त्यांना तुरुंगात असताना रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कवितांचा परिचय करून दिला. प्रधान सरांना बंगाली भाषा तर आवडलीच; पण रवींद्रनाथांच्या काव्यातील माधुर्यही भावलं.
पुढं देशाला स्वातंत्र्य मिळालं. प्रधान सर राजकीय पटलावर वावरू लागले. प्राध्यापक, स्वातंत्र्यसैनिक या भूमिका मागे पडल्या. पुढे ते विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. विरोधी पक्षाचे आमदार ही नवी भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे निभावली.
प्रधान सर आमदार निवासात राहत होते तेव्हाची गोष्ट! सरांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. त्यावेळी माननीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रधान सर मंत्रालयात निघाले. सोबत त्यांचे स्वीय सहाय्यक चंद्रकांत निवंगुणे हे होते. ते मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडे निघाले; तर त्यांच्या केबिनबाहेर अनेकजण ताटकळत बसलेले. त्यात अनेक कार्यकर्ते व पुढारी होते.कुणाला सरकारी जमीन हवी होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)