विदर्भाला गारपिटीचा तडाखा 

संग्रहित छायाचित्र

नागपूर – विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना आज वादळी पावसासह गारपीटचा तडाखा बसला आहे. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा पाऊस झाल्याने सर्वत्र गारांचा थर साचला होता. ऐन होळीच्या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणावर पावसासोबतच गारांचा भडीमार झाल्याने अनेक ठिकाणी लोकांची तारांबळ उडाली, तर शेतातील हातात आलेल्या रब्बी पिकांवर पाणी सोडावे लागणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)