स्त्रियांमधील हृदयविकार

आशियाई देशांत मधुमेहाने साथीच्या रोगाप्रमाणे उग्र स्वरूप धारण केले असून मधुमेह असणाऱ्या स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्‍यता तीन पटींनी जास्त असते. माझ्या अनुभवानुसार मधुमेही स्त्रियांमध्ये — वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्‍तवाहिन्यांचा विकार होण्याचे प्रमाण जास्त आढळून येते.
कारणे 
वयाच्या अलीकडच्या टप्प्यावरच हृदय रक्‍तवाहिन्यांचा विकार होण्याची आनुवंशिकता असल्यास
स्थूलत्व विशेषत: ओटीपोटाच्या भागात
डिस्लीपिडीमिया (रक्‍तातील लिपिड्‌सचे असंतुलित प्रमाण (उदा. ट्रायग्लिसराइड्‌स, कोलेस्ट्रॉल आणि किंवा फॅट फोस्फोलिपिड्‌स
धूम्रपान, ताण 
बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झालेले इस्ट्रोजेनचे प्रमाण आणि इतर आजारांची गुंतागुंत हेसुद्धा स्त्रियांमध्ये सीएडी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. ताणाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दशकांत भारतीय स्त्रियांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. भारतीय स्त्रिया सर्व क्षेत्रात हिरीरीने काम करत आहेत, मात्र, घरगुती कामांतून त्यांची सुटका झालेली नाही. त्याच्या जोडीला मुलांच्या मागण्या, न्यूक्‍लियर कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबातील इतरांचा मर्यादित पाठिंबा या घटकांमुळेही स्त्रियांवरील ताण सातत्याने वाढत आहे. काम करणाऱ्या स्त्रिया अनेकदा चुकीचा आहार घेतात आणि व्यायाम करत नाहीत. त्यामुळेही भारतीय स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. रक्‍तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. छातीत दुखण्याची जागा तीव्र थकवा, धाप लागणे, अपचन, जबडा किंवा घसादुखी, पाठीच्या वरच्या भागात दुखणे यांनी घेतली आहे.
रक्‍तवाहिन्यांचा तीव्र त्रास असलेल्या बहुतेक स्त्रिया उशिरानेच डॉक्‍टरकडे धाव घेतात. या विलंबामुळेच प्राथमिक अँजिओप्लास्टीसारखे उपचार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी प्रमाणात सुचवले जातात. विलंब झाल्यामुळे त्यांच्या रक्‍तवाहिन्यांमधील गुंतागुंतही वाढलेली असते. हृदयविकाराच्या झटक्‍यातून सावरणाऱ्या फार कमी स्त्रियांना हृदयाचे पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला जातो.
स्वत:ला वाचवण्यासाठी काय कराल? 
हृदयविकाराच्या संभाव्य धोकादायक लक्षणांची माहिती घ्या. मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनाही माहिती द्या.
वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करा. तुमचे वय तीसपेक्षा जास्त असेल, तर स्तनांची तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे करून घेण्याबरोबर हृदयाचे परीक्षणही करून घ्या.
लक्षात घ्या, पहिला तास हा सुवर्णतास असतो. या तासाभरात मिळालेला उपचार तुमच्या आरोग्यावर लघु व दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. ताणमुक्त करण्याची सवय लावून घ्या. चांगला आहार घेण्याची सवय लावा आणि धूम्रपान करू नका.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)