हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 2)

-डाॅ. मानली गुप्ता-पाटील

मी माझ्या मित्रपरिवारासह पुण्याजवळच एका शांत ठिकाणी आले होते. रोजच्या कामाच्या गडबडीतून असा स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी वेळ काढल्यामुळे खरंच खूप छान वाटत होते. ताजी-स्वच्छ हवा, गवतावर चमचमणारे दवबिंदू, ओल्या मातीचा सुगंध, टवटवीत फुले आणि पक्ष्यांची किलबिल… सगळेच वातावरण अगदी अल्हाददायक होते! माझ्या मनात विचार आला, असेच वातावरण कायम आपल्या भोवती असते तर? आपल्याला ना डॉक्‍टरांची गरज पडली असती ना ही गोळ्या-औषधांची! कायम आनंदी आणि निरामय राहिलो असतो आपण कदाचित!!

कार्निटीन हृदयाच्या स्नायूंची क्षमता वाढवते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्निटीनमुळे अशक्त रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते, हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाला असताना दूषित घटकांचा निचरा करण्याचे काम कार्निटीन करते. यामुळे अनेक प्रकारच्या हृदयविकारांमध्ये (Dilated cardiomyopathy, arrhythmias, peripheral vascular disease, acute ischemia ) कार्निटीन मदत करते. कार्निटीन मज्जतंतूंचे कार्यदेखील सुधारते, वार्धक्‍याचे परिणाम काही अंशी कमी करते. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मात्र कार्निटीनचा काही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.

मग तुम्ही उच्चरक्तदाब असणाऱ्यांना त्यांच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्निटीनचे सप्लिमेंट देता का?
मी विचार करून म्हटले, आपण पूर्वी बोलल्याप्रमाणे कार्निटीन आपल्या शरीरात तयार होतेच. त्यामुळे एखाद्या माणसामध्ये कार्निटीनची कमतरता असल्याशिवाय उगीच सप्लिमेंट्‌स देण्याची गरज नाही.

काहीवेळा तर गरज नसताना कार्निटीन घेतल्यामुळे रक्तदाब वाढणे, ताप येणे, फेफरे येणे यासारखे साईड इफेक्‍टस्‌ सुद्धा दिसू शकतात. याबरोबरच हे जास्तीचे कार्निटीन अनेक औषधांच्या कामामध्ये अडथळा ठरू शकते (उदा. cenucoumarol warfarin सारखी रक्त पातळ ठेवणारी औषधे). पण ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे अशा व्यक्तींसाठी कार्निटीन उपयुक्त ठरते.

हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 1)      हृदयाचे स्नायू बळकट हवेत (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)