सर्वोच्च न्यायालयात भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी आज सुनावणी

नवी दिल्ली – भीमा-कोरेगाव येथील दंगलीच्या घटनेचे पडसाद संपूर्ण पुणे शहरासह राज्यात उमटले होते. या घटनेमुळे महाराष्ट्र बंद, पीएमपी बस आणि खाजगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयात भीमा-कोरेगाव येथील दंगली प्रकरणात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. रोमिला थापर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, बुधवार दिनांक २४ ऑक्टोबरला वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयातला या प्रकरणी त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली होती. या प्रकरणी चीफ जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस एएम खानविलकर आणि जस्टिस डीवाई चंद्रचूड़ या तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एसआयटी तपासाला नकार दिला होता. तसेच न्यायालयाने पुणे पोलिसांनाच या प्रकरणात तपास पुढे चालू ठेवण्याची सुनावणी केली होती. याच सुनावणीवर रोमिला थापर यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भीमा कोरेगाव दंगल 1 जानेवारीला झाली होती, तसेच या प्रकरणातील तपासही फार दिवस लांबला आहे. त्याचबरोबर घटनेशी आणखी हिंसक घटनांचे तार जोडलेले दिसून आले. इतकेच नव्हे तर हे तार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हत्येचा षड्यंत्रमध्ये सुद्धा दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)