रामजन्मभूमी वादावर 26 फेब्रुवारीला सुनावणी

नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमी – बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 26 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या या प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारीला नियोजित असलेली सुनावणी 27 जानेवारीला रद्द केली होती. या सुनावणीच्या पिठामधील न्या. एस.ए. बोबडे त्यादिवशी उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली होती. आता सरन्यायाधीश गोगोई यांच्याव्यतिरिक्‍त न्या. बोबडे, न्या.डी.वाय.चंद्रचूड, न्या. अशोक भुषण आणिन्या. एस.ए. नझीर यांच्या घटनापिठापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलाहबाद उच्च न्यायालयाने 2010 साली या संदर्भातील चार प्रकरणांवर एकत्र आदेश दिला होता. अयोध्येतील वादग्त्रस्त 2.77 एकर भूखंडाचे तीन समान भागांमध्ये विभाजन करण्यात यावे. सुन्नी वक्‍फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम ललाच्या नावे या भूखंडांचे वाटप करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)