प्रा.आनंद तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर 22 मार्चला सुनावणी

मुंबई: माओलवाद्यांशी सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिन अर्जाची सुनावणी 22 मार्च पर्यंत तहकूब ठेवण्यात आली.न्यायमूर्ती पी.एन.देशमुख यांनी अर्जाची सुनावणी निश्‍चित करताना तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज भासल्यास 1 लाख रुपयाच्या वैयक्तीक जातमुचलक्‍याच्या जामीनावर सुटका करण्याचे न्यायालयाचे निर्देश कायम ठेवले.

पुणे पोलसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपाखाली दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडेना अटकेपासुन दिलासा दिला. त्यानंतर पुणे कनिष्ट न्यायालयने चार दिवसापूर्वी अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने प्रा.आनंद तेलतुंबडे यांच्यावतीने ऍड. मिहिर देसाई यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज न्यायमूर्ती पी.एन.देशमुख यांच्या समोर सुनावणीसाठी घेण्यात आला. न्यायालयाने अर्जाची सुनावणी 22 मार्चला निश्‍चित केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)