मंगळवारीही होणार नाही अयोध्य प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील घटनपीठाच्या पाच न्यायाधिशांपैकी एक न्यायाधिश उपलब्ध नसल्याने अयोध्या प्रकरणाची मंगळवारी होणारी सुनावणीही पुढे ढकलली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच ही माहिती दिली आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी अयोध्य प्रकरणाची सुनावणी करण्यासाठीच्या खंडपीठाची पुनर्ररचना करून त्या पीठांत आणखी दोन न्यायाधिशांची नियुक्ती केली होती त्यामुळे हा विषय वेगाने मार्गी लागेल असे सांगितले जात होते पण मंगळवारी होणारी सुनावणीच न्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलली जाणार आहे.

या विषयाची या आधीची सुनावणी गेल्या 11 जानेवारीला झाली होती पण तीही झटक्‍यातच आवरण्यात आली. नवीन खंडपीठ या प्रकरणाच्या सुनावणीच्या स्वरूपाविषयी निर्णय घेईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार या खंडपीठात न्या अब्दुल नझीर आणि न्या अशोक भुषण यांची निवड करण्यात आली होती. पण या खंडपीठातील न्यायाधिशांपैकी युयु ललित यांनी अयोध्या प्रकरणातील सुनावणीतून आपले अंग काढून घेतले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात आपण 1997 साली उत्तरप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वकिल पत्र घेतले होते त्यामुळे आपण या खंडपीठात काम करणे योग्य होणार नाही असे नमूद करीत त्यांनी यातून अंग काढून घेतले होते. आता मंगळावारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्या. बोबडे हे रजेवर असल्याने कोणत्याही सुनावणीविना पुढील तारीख पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय अनेक दिवस प्रलंबीत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)