मराठा आरक्षण याचिकेची सुनावणी संपली : न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती नाही

मुंबई – राज्य सरकारने मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाविरोधात दाखल
करण्यात आलेल्या याचिकांवर उभय पक्षांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती
डांगरे यांच्या खंडपीठाने अखेर निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय उन्हाळी सुटीनंतर जून महिन्यात होण्याची शक्‍यता
आहे. दरम्यान न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने प्रवेश प्रकिया सुरूच राहणार
आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने कायद्यात नव्याने दुरुस्ती करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याला जयश्री
गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह सहा याचिका हायकोर्टात दाखल झाल्या
आहेत. त्यापैकी 4 विरोधात तर 2 याचिका आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या आहेत. तर या याचिकेत हस्तक्षेप करणारे 22 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 16 अर्ज हे आरक्षणाचे समर्थन करणारे आहे.

या सर्व याचिकांवर गेले दिड महिने सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने आपली भुमिका मांडली. त्यावर याचिकाकर्त्यांनी पुन्हा युक्तिवाद पुर्ण केल्यावर न्यायालयाने आज निर्णय राखून ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)