सिंचन घोटाळ्याची सुनावणी नवीन न्यायाधीशांसमोर

नागपूर: सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या दोन याचिकांवर आता नवीन न्यायाधीशांसमोर सुनावणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीस न्यायमूर्ती रवि देशपांडे, न्या. विनय जोशी यांनी नकार दर्शविला आहे.

विर्दभातील गोसीखुर्द आणि जिगाव सिंचन घोटाळ्या प्रकरणी उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

-Ads-

ही सुनावणी न्या. रवि देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या पीठासमोर सुरु होती. मात्र, यातील न्या. देशपांडे यांनी तांत्रिक कारणामुळे याचिकेवरील सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी नवीन न्यायाधीशांसमोर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)