आरोग्य मेळावा हा राजकीय स्टंट नाही

खा. उदयनराजे भोसले : सर्वसामान्यांच्या हितासाठीच आरोग्य तपासणी

कोरेगाव  – वेळीच रोग निदान न झाल्याने आणि उपचार न मिळाल्याने अनेक जवळच्या मित्रांचे निधन झाले आहे, ही मनाला लागलेली गोष्ट आहे. आरोग्य जोपासणे हे केवळ मोठ्या लोकांचे काम नाही. आता सर्वसामान्यांनी देखील वेळीच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कोरेगावातील आरोग्य तपासणी मेळावा हा राजकीय स्टंट नाही तर सामान्य लोकांविषयी असलेली भावना आहे, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्यावतीने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात झालेल्या महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आ. शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, तालुकाध्यक्ष किशोर बाचल, स्वाभिमानी विचारमंचचे सुनील खत्री, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रभाकर बर्गे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सौ. अर्चना देशमुख, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खा. श्री. छ. उदयनराजे पुढे म्हणाले, सध्या धावपळीच्या युगात सर्वत्र प्रदुषण वाढले आहे. प्रत्येकाने वेळेत न घाबरता आरोग्य तपासणी केल्यास, वेळेत रोगाचे निदान होऊन लवकर बरे होण्यास मदत होणार आहे. सध्या कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. एकट्या सातारा जिल्ह्यात दररोज 60 हून अधिक रुग्ण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)