शरीर ही संपत्तीच

-डाॅ. विजय कुलकर्णी

दिवसेंदिवस रोगांचे प्रमाण हे फार वाढत चालले आहे. कारण 1975 सालापासून हवेच्या, पाण्याच्या प्रदूषणात फार वाढत होत चालली आहे. हवेमध्ये तपमानाचे प्रमाण इतके वाढले आहे की, 40 ते 45 अंश उष्णतामानाची उंची वाढली आहे. याला कारणीभूत आपणच आहोत. जंगलसंपत्ती नष्ट होत चालली आहे. केरकचऱ्याची विल्हेवाट चांगली लावली जात नाही.

अनेक पाण्याच्या पुष्टभागावर जलपर्णीचा थर येत चालला आहे. नद्यामध्ये केमिकलचे पाणी सोडले जात आहे. धुरामुळे हवेत कार्बनडाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे. सकस आहार, शुद्ध भाजीपालार, निरजंतुक शुद्ध पाणी मानवाला मिळत नाही.
तेव्हा झाडे लावा, झाडे जगवा हा गुरूमंत्र प्रत्येकाने जपायला पाहिजे.

सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला, धान्य, पिकावयास पाहिजे. अतितीव्र कीटकनाशके आणि रासायनिक खतांमुळे, अतिपाण्यामुळे शेतीचे सुद्धा आरोग्य धोक्‍यात आले आहे. स्वत:चे आरोग्य सुधारण्यासाठी मानवाने शारीरिक व्यायाम हा प्रत्येकाने केला पाहिजे. प्रदूषणमुक्त सायकल दररोज 2 कि. मी. चालवा.

सायकल ही गरिबांची टू-व्हीलर होय. चालणे, पोहोणे, सूर्यनमस्कार हे व्यायामाचे प्रकार आहेत. सेंद्रीय खताने पिकवलेला भाजीपाला, फळे, कडधान्ये, धान्य खा. शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यासाठी तुळसीचा पाला, कडू लिंबाचा पाला सकाळी आंघोळ करून खा. तरुणवर्गाने दररोज थंडपाण्याने आंधोळ करा.

अनेक रोग हे अशुद्ध पाण्यापासून होतात. तेव्हा निरजंतुक शुद्ध पाणी घ्या. लिंबाचे कडू झाड हे आयुर्वेदात कल्पवृक्ष मानले जाते. कोणतीही औषधे ही कडू असतात. पण रोग्यास पथ्यकारक असतात. भरपूर दूध पीत जा. दूध हे पूर्ण अन्न आहे.
तेव्हा शरीर ही एक संपत्ती आहे तिचे जतन प्रत्येकाने करावयास पाहिजे.

निर्व्यसनी जीवन जगा. शरीर निरोगी तर स्वत: या प्रपंच, निरोगी, जग निरोगी, रानावनात भरपूर आयुर्वेदिक वनस्पती आहेत. ती शोधण्याचा प्रयत्न करा.

आपले जीवन आनंदी आणि समाधानी पद्धतीने जगायचे असेल, तर आपले आरोग्य उत्तम राखणे आणि त्यासाठी शरीराचे आरोग्य उत्तम राखणे हे महत्त्वाचेच असते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आजार संभवतात. म्हणून शरीराचे आरोग्य ही एक संपत्ती असल्याचे मानले जाते, ते काही उगाच नव्हे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)