शहरी गरीब योजनेत मिळणार आणखी दिलासा

ज्येष्ठ नागरिक, अनाथ मुलांसाठी नियम बदल्यास प्रशासन राजी

पुणे – शहरी गरीब योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि अनाथांना वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अट शिथील केली जाण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस नगरसेवक अविनाश बागवे आणि गटनेते अरविंद शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीसमोर ठेवला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून ही अट शिथील करणे शक्‍य असल्याचे आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे.

-Ads-

वस्तीमध्ये तसेच खासगी वृद्धाश्रमात राहणाऱ्या 60 वर्षांवरील नागरिकांना उत्पन्नाची अट शिथील करावी, अनाथ मुलांचाही या वैद्यकीय योजनेत समावेश करून त्यांचीही उत्पन्नाची अट शिथील करावी, शहरी गरीब योजने अंतर्गत मिळणारा 1 लाखांचा उपचार खर्च आर्थिक दुर्बल घटकांना परवडत नसल्याने तो 2 लाख करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावावर आरोग्य विभागाने आपला अभिप्राय समिती समोर सादर केला आहे. मात्र, या बाबींसाठी या योजनेत अतिरिक्‍त भरीव तरतूद केली तरच योग्य पद्धतीने या सेवांचा लाभ देणे शक्‍य असल्याचे या अभिप्रायात म्हटले आहे. जानेवारी 2018 मध्ये हा प्रस्ताव दिल्यानंतर समितीने प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविला होता.

उत्पन्नाची अट वगळण्यास प्रशासन अनुकूल
वस्त्यांमध्ये राहणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांसाठीची तहसीलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट वगळण्यास परवानगी दिली आहे. तर, खासगी वृद्धाश्रमांतील ज्येष्ठानांही ही सुविधा देता येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, वयाच्या दाखल्यासाठी आधारकार्ड प्रत, 1 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या शिधापत्रिकेची झेरॉक्‍स, तसेच 200 रुपये नोंदणी व सुविधा शुल्क भरावे लागेल. वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांना संस्थेची नोंदणी तसेच इतर काही कागदपत्रे आवश्‍यक असणार आहेत.

अनाथ मुलांसाठी स्वतंत्र निर्णय
शहरी गरीब योजनेत अनाथ मुलांचा समावेश करताना मुलाचे वय 25 पेक्षा जास्त नसावे, अनाथाश्रमाकडून मुलाचे पालकत्व घेतल्याचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. तर आश्रमात न राहणाऱ्या इतर मुलांसाठी स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)