श्रीरामपूरचा मुख्याध्यापक, शालेय समिती अध्यक्ष लाचेत गजाआड

नगर: शालेय गणवेश पुरवठादाराकाडून 11 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खानापूर (ता. श्रीरामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब सोपान बरडे (वय 38), शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब छबुराव जगताप (वय 32) व कॉंग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक राजेंद्र रामचंद्र आदिक (वय 45, रा. थत्ते मैदान, श्रीरामपूर) या तिघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर पथकाने गजाआड केले आहे.

श्रीरामपूर येथील खंदारे ट्रेडर्सतर्फे जिल्हा परिषदेच्या खानापूर शाळेतील मुलांना गणवेश पुरविण्याचे काम केले जाते. त्यानुसार खंदारे ट्रेडर्सने 106 गणवेश पुरविले होते. प्रति गणवेश 300 रुपये प्रमाणे शाळेकडून 31 हजार 80 रुपये अदा करण्यात आले आहे. परंतु या तिघा आरोपींनी खंदारे ट्रेडर्सकडे प्रति गणवेश 135 रुपये प्रमाणे पैसे घेऊन उर्वरित रक्कम 11 हजार 500 रुपयांची लाच म्हणून मागणी केली. लाच दिली नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, अशी धमकी खंदारे ट्रेडर्सला दिली. मुख्याध्यापक बाळासाहेब बरडे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब जगताप हे दोघे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पोहचले.

खंदारे ट्रेडर्सचे संचालक तिथे लाचेच्या एकूण रकमेपैकी साडेआठ हजार रुपये घेऊन आले. त्याअगोदर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. मुख्याध्यापक बरडे व जगताप या दोघांना लाचेच्या रकमेपैकी साडेआठ हजार रुपये घेताना नगरच्या पथकाने पकडले. मध्यस्थी केली म्हणून राजेंद्र आदिक यांच्यावर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्‍याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे यांनी ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)