‘गोल्डन बूट’ पटकावला परंतु निराश

फुटबॉलविश्वात विश्वचषक ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला मानाचा ‘गोल्डन बूट’ हा पुरस्कार मिळतो. हा पुरस्कार मिळवणे हे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. जगातील सर्वश्रेष्ठ स्ट्रायकर्स देखील तो पुरस्कार मिळवण्यासाठी अतोनात परिश्रम घेतात. परंतु खूपच नशीबवान खेळाडूला तो पुरस्कार मिळतो. यंदाच्या विश्वचषकात हा पुरस्कार इंग्लंडच्या हॅरी केन याने पटकावला.

हॅरी केन हा इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लब ‘टॉटेनहम हॉट्सपर’ साठी खेळतो. मागील दोन- तीन मोसमांपासून हा संघ विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहे परंतु सतत विजेतेपद त्यांना हुलकावणी देत आहे. विश्वचषकानंतर मिळालेल्या सुट्टीत देखील हॅरी केन टॉटेनहम हॉट्सपर येथे गेला. आपल्या सहखेळाडूंचा सराव पाहिला आणि प्रशिक्षक मॉरिसियो पोचेटिनो यांच्याशी चर्चा केली.

-Ads-

टॉटेनहम हॉट्सपरचे प्रशिक्षक मॉरिसियो पोचेटिनो यांनी काही गोष्टींचा खुलासा करत स्टार खेळाडू हॅरी केन चांगल्या विश्वचषकानंतर देखील निराश आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले,” मी त्याला चांगल्या कामगिरीसाठी अभिनंदन केले पण तो म्हणाला, मी आणखी गोल करायला हवे होते.” मी  म्हणालो, हॅरी तू गोल्डन बूट मिळवला आहे. हॅरीने उत्तर दिले, “उपांत्यफेरी गाठणे आणि सहा गोल हे कमीच आहे.”

त्याला नेहमीच जिंकायचे असते . चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या स्थानावर त्याला समाधान मिळत नाही म्हणून मला हा खेळाडू आवडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)