पुणे – उन्हाळ्यात ‘टेन्शन’ अटळ : धरणसाखळीत पाणीसाठा 12 टीएमसीवर

संग्रहित छायाचित्र ...

मागील वर्षापेक्षा साडेचार टीएमसी कमी साठा

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर आणि वरसगाव धरणांत एकूण 11.89 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 4.42 टीएमसीने हा पाणीसाठा कमी आहे. त्यातच शेतीसाठी सोडावे लागणारे आर्वतने, शहराला पिण्यासाठी पुढील पाच महिने आवश्‍यक पाणी, उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन या बाबी पाहता पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार असून पुणेकरांनाही पाण्यासाठी “टेन्शन’ सहन करावे लागणार आहे.

यंदा समाधानकारक पावसामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे 100 टक्के भरली. जुलै ते ऑगस्ट 2018 दरम्यान खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. मात्र, परतीच्या पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि ग्रामीण व शहरी भागात पाण्याची वाढती मागणी, यामुळे पाण्यावरून वादंग निर्माण झाले होते. धरणे भरूनही शहराला मिळणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये कपात करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे. शहराला रोज दोनवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 1,350 एमएलडी इतक्‍या पाण्याची आवश्‍कता भासते. अशातच 200 एमएलडी इतके कमी पाणी उचलावे. शहराच्या पाण्यात कपात करून ते पाणी शेतीला द्यायचे असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे होते. त्यानुसार शेतीला आर्वतन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा शेतीसाठीचे एक आर्वतन कमी करून ते पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी देण्याचा निर्णय अंधातरीच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेमघर धरण शुन्यावर
सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 11.89 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी खडकवासला प्रकल्पात 16.31 टीएमसी इतका पाणीसाठा होता. टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. त्यामुळे टेमघर धरण लवकर रिकामे करण्यात आले.

पाच महिन्यांचे नियोजन आवश्‍यक
साधारणपणे दि.7 जूनपासून राज्यात पावसाला सुरूवात होते. त्यानंतर हळूहळू पाणलोट क्षेत्रात पाणी साठण्यास सुरुवात होते. 15 जुलैपर्यंत ओढ्या-नाल्यांद्वारे धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा होते. त्यामुळे दरवर्षी 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाणी वापराचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे पुढील पाच महिने पुरेल असे पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)