कोर्टालाही कठपुतळी बनवण्याचा प्रयत्न केला : राहुल

न्या जोसेफ यांच्या दाव्यावरून केला आरोप

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश कुरियन जोसेफ यांच्या दाव्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडून न्यायालयाच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप झाल्याचा दावा न्या जोसेफ यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी म्हटले आहे की चौकीदाराने न्याय व्यवस्थेलाही आपले बटिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की असे मोदींनी प्रयत्न केले असले तरी चौकीदाराचे कमनशिब असे की न्याय व्यवस्थेतही अनेक प्रामाणिक न्यायाधिश कार्यरत आहेत. त्यांनी सत्तधाऱ्यांचा माज चालवून घेतला नाही.

-Ads-

माजी न्यायाधिश जोसेफ यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला सनसनाटी मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की तत्कालिन सरन्यायाधिश दीपक मिश्रा हे बाह्य शक्तींकडून रिमोट कंट्रोल सारखे वापरले गेले. बाह्य शक्तींचे सरन्यायाधिशांवर रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रण होते असे त्यांचे म्हणणे होते. न्या. जोसेफ यांच्या दाव्यामुळे मोठीच खळबळ माजली आहे. त्या आधारावर राहुल गांधी यांनी आज मोदींवर हा निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्‌विटर अकौंटवर ही टीका केली आहे. तत्कालिन सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या विरोधात ज्या चार अन्य न्यायाधिशांनी जाहीर बंड केले होते त्यात न्या जोसेफ यांचा समावेश होता. न्यायव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपाला न्या. जोसेफ यांच्या वक्तव्यामुळे पुष्टी मिळाली आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)