नवी दिल्ली – एचडीएफसीने चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदनुसार कंपनीच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत 27 टक्के वाढ होऊन तो 2862 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 2227 कोटी रुपये होता.
या तिमाहीत कंपनीचा महसूल 11586 कोटी रुपये झाला आहे. जोकी गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत 9322 कोटी रुपये इतका होता. या तिमाहीत कंपनीचे व्याजाचे उत्पन्न 3161 कोटी रुपये झाले आहे. जेकी गेल्या वर्षीच्या या तिमाहीत 2650 कोटी रुपये होते. कंपनीच्या संचालक मंडळाने पूर्ण वर्षासाठी 21 रुपयाचा लाभांश जाहीर केला आहे.