डॉस्टनबीके, सेर्गेय फोमीन, सिध्दांत बांठीया, वांग हॉंग यी कोडी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा 2018

पुणे – मुलांच्या गटात कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलताव, उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन, भारताच्या सिध्दांत बांठीया, कोरियाच्या सीओन यॉंग हन यांनी तर, मुलींच्या गटात हॉंग कॉंगच्या वांग हॉंग यी कोडी, थायलंडच्या मनचया सवांगकिइ व मई नपात निरुदोर्न, इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुगरो या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावने भारताच्या सच्चीत शर्मावर 6-4, 2-6, 6-4असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत देव जावीयाचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 7-5असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

तिसऱ्या मानांकित कोरियाच्या सीओन यॉंग हनने सातव्या मानांकित भारताच्या मन शाहचा 6-0, 6-4असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने भारताच्या पाचव्या मानांकित मेघ भार्गव पटेलचे आव्हान 6-2, 6-1असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात हॉंग कॉंगच्या अव्वल मानांकित वांग हॉंग यी कोडी हिने पाचव्या मानांकित मना कावामुराचा 6-0, 2-6, 7-5असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने जपानच्या सहाव्या मानांकित फुना कोझाकीला 6-4, 7-5असे नमविले. चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या प्रिस्का मॅडेलिन नुगरोने सातव्या मानांकित चीनच्या जियाकी वांगचा 5-7, 6-3, 6-4असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या आठव्या मानांकित मई नपात निरुदोर्नने उझबेकिस्तानच्या यास्मीन करीमजानोवाचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(4)असा पराभव केला.

दुहेरीत उपांत्य फेरीत मलेशियाच्या क्रिस्टीन डीडीयर चिन व उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीन यांनी भारताच्या सिध्दांत बांठीया व मेघ भार्गव पटेल यांचा 6-3, 6-4असा तर, भारताच्या देव जावीया व मन शहा या जोडीने सीओन यॉंग हन व सुकसुमराम टी यांचा 6-1, 6-2असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल –

उपांत्यपूर्व फेरी : मुले – डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान)(1)वि.वि.सच्चीत शर्मा(भारत)6-4, 2-6, 6-4, सिध्दांत बांठीया(भारत)(4) वि.वि.देव जावीया(भारत)7-6(5), 7-5, सीओन यॉंग हन(कोरिया)(3)वि.वि.मन शाह(भारत)(7)6-0, 6-4, सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)वि.वि.मेघ भार्गव पटेल(भारत)(5)6-2, 6-1.

मुली – वांग हॉंग यी कोडी(हॉंग कॉंग)(1)वि.वि.मना कावामुरा(जपान)(5)6-0, 2-6, 7-5, मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि.फुना कोझाकी(जपान)(6)6-4, 7-5, प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)वि.वि.जियाकी वांग(चीन)(7)5-7, 6-3, 6-4 मई नपात निरुदोर्न(थायलंड)(8) वि.वि.यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान)6-4, 7-6(4).

दुहेरी : उपांत्य फेरी : मुले – क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(3) वि.वि.सिध्दांत बांठीया(भारत)/मेघ भार्गव पटेल(भारत)(1)6-3, 6-4, देव जावीया(भारत)/मन शहा(भारत) वि.वि.सीओन यॉंग हन(कोरिया)/ सुकसुमराम टी(थायलंड)(2)6-1, 6-2.

दुहेरी गट : उपांत्य फेरी : मुली – साकी इमामुरा(जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड(थायलंड)वि.वि.मना कावामुरा(जपान)/फुना कोझाकी(जपान)6-4, 7-5, हिमारी सातो(जपान)/मनचया सवांगकिइ(थायलंड)वि.वि. प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)/ जियाकी वांग(चीन)(4)3-6, 6-3(10-4).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)