सीबीआय संबंधी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने आज सीबीआय प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारने सीबीआयचे संचालक अलोक कुमार वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून एम नागेश्वर यांना सीबीआयचे प्रभारी प्रमुख बनवले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश वी. के. राव यांच्या खंडपीठाने सदर जनहित याचिका फेटाळताना सांगितले की, या प्रकरणामध्ये सीबीआयचे संचालक अलोक कुमार वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी अधिच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने आम्ही यामध्ये हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचे खंडपीठाने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)