#HBDsaitamhankar : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री

मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. २५ जून १९८६ सांगली येथे सईचा जन्म झाला. सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते. मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले.

सईच्या चित्रपटांनी गेल्या तीन-चार वर्षांत व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असते, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचे यश हे गणित गेल्या काही वर्षांत जमून गेले आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरने जेव्हा बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा सर्वजण अवाक झाले. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.

२०१८ मध्ये महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. ह्या मुळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे. २०१३ मध्ये सई ताम्हणकर अमेय गोसावी सोबत विवाहबंधनात अडकली होती. २०१८ मध्ये तिने घटस्फोट घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)