#HBD ‘ट्रॅजेडी क्वीन’ अभिनेत्री मीना कुमारी

अजीब दास्ताँ है ये
कहाँ शुरू कहाँ ख़तम
ये मंजिलें है कौन सी
न वो समझ सके न हम!

ह्या ओळी आजही ऐकल्या तर आजही ‘ट्रॅजेडी क्वीन’ अभिनेत्री मीना कुमारी यांचा चेहरा समोर येतो. आणि अनेक कलाप्रेमींचे मन जिंकून जाते. गायक, गझलकार म्हणून सुद्धा त्यांनी नाव कमविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाँद तन्हा है आस्माँ तन्हा
दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा…

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज वाढदिवस. ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली मीना कुमारी भारतीय चित्रपटात नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी त्यांनी ‘नाझ’ हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक भूमिका केल्यामुळे तिला ‘ट्रॅजेडी क्वीनही’ म्हणत असत. तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.

गुगलने सुद्धा मीना कुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मीना कुमारीचे जीवन दुःखद घटनांनी व्यापून होते. मात्र त्यांच्या अभिनयामुळे आजही मीना कुमारी कलाक्षेत्रात जिवंत आहेत.

मीना कुमारी यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली

मीना कुमार यांना ४ वेळा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. इतर अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. १९५२ मध्ये ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने मीना कुमारी यांना चित्रपट सृष्टीत यश मिळवून दिले.

पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या मीना कुमारी यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्या होत्या. त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे कमाल अमरोही यांच्याशी मीना कुमारी यांचा विवाह झाला होता. परंतु काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. ‘पाकिजा’ या चित्रपटानंतर ३१ मार्च १९७२ रोजी त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)