#HBD SRK : व्हीलेन ते किंग ऑफ रोमांसचा प्रवास 

बॉलिवूड किंग शाहरुख खान आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्लीत जन्मलेल्या किंग खानने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९८८ साली ‘फौजी’ या टीव्ही सीरिअलमधून त्याने डेब्यू केला होता. शाहरुखने सर्कस, इडियट, उम्मीद, वाघले की दुनिया यासारख्या टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. यानंतर शाहरुखने हेमा मालिनीच्या मदतीने बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. शाहरुख आणि दिव्या भारतीचा  १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिवाना’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस उतरला.

यश चोप्रा बॅनरखाली शाहरुख खानने ‘डर’ आणि ‘बाजीगर’ या चित्रपटांमध्ये व्हीलेनची भूमिका केली होती. डरमध्ये शाहरुखने सायको प्रियकराची तर बाजीगरमध्ये एका खुनीची भूमिका साकारली होती. डर चित्रपटातील अभिनयासाठी शाहरुखला बेस्ट व्हीलेनचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर शाहरुख खानला एका व्हीलेनच्या रूपात ओळखले जाऊ लागले होते. परंतु, १९९५ साली प्रदर्शित ‘करण-अर्जुन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला व शाहरुख खान यशाच्या शिखरावर जाऊन पोहचला. यानंतर ‘दिल तो पागल है’, ‘दिल से’, ‘वीर जारा’, ‘जब तक है जान, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मोहब्बतें’, ‘रब ने बना दी जोड़ी’ यासारख्या अनेक रोमँटिक चित्रपटात शाहरुखने काम केले. व बॉलिवूडचा ‘किंग ऑफ रोमांस’चा किताब शाहरुखला मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाहरुख खानची सर्वच अभिनेत्रींसोबत केमिस्ट्री कमाल राहिली आहे. परंतु, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ते ‘दिलवाले’ चित्रपटापर्यंत काजोलसोबतची शाहरुखची जोडी नेहमीच मोठा पडद्यावर हिट ठरली आहे.

शाहरुखने बॉलिवूडमध्ये करिअर सुरु होण्याआधीच १९९१ रोजी गौरीसोबत विवाह केला होता. शाहरुखला आर्यन खान, सुहाना खाना आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत. तसेच चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदानासाठी शाहरुखला ‘पदमश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)