#HBD SRK : क्रिकेटमधील दिग्गजानी सुध्दा दिल्या शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड किंग शाहरुख खान आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्लीत जन्मलेल्या किंग खानने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज बॉलिवूडचा किंग अशी त्याची जगभरात अोळख आहे. असे असले तरी त्याचे क्रिकेट प्रेम आपण सर्वांना माहितच आहे.

आयपीएलमधील ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या क्रिकेट संघाचा मालक असलेला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची खेळाविषयीची आवड आपण पाहतोच आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी देखील शाहरुख पोहोचला होता. तसेच भारतीय संघाच्या अनेक महत्वाच्या सामन्याच्यावेळी देखील संघाला प्रोत्साहान देण्यासाठी उपस्थित असल्याचे आपण त्याला पाहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रिकेटप्रेमी अभिनेता शाहरूख खान याला वाढदिवसानिमित्त बाॅलीवूडमधील कलाकार तसेच क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक खेळांडूनी त्याला ट्विट करत  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर

विरेंद्र सेहवाग

हरभजन सिंग

आकाश चोप्रा

मोहम्मद कैफ

सुरैश रैना

ट्विटरवर #HappyBirthdayShahRukhKhan, #HappyBirthdaySRK आणि #KINGKHAN हे हॅशटॅग वापरून शाहरूखवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फक्त क्रिकेट क्षेत्रातूनच नाही तर विविध क्षेत्रातील मान्यवरानीही शाहरूखला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)