#HBD: सारा अली खानचा आज २५वा वाढदिवस !

सारा अली खानचा आतापर्यंत एकसुद्धा चित्रपट प्रसिद्ध झाला नाही. मात्र ती सतत चर्चेत असते.  तसेच प्रसिद्ध स्टार किड म्हणून तिची ओळख आहे. सैफ अली खान याची मुलगी सारा आज आपला २५वा वाढदिवस साजरा करत आहे.

सारा आपला वाढदिवस तिचा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’च्या कलाकारांसोबत साजरा करत आहे. साराला सोशल मिडीयावर अनेक कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराच्या वाढदिवसाचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये सारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत आपला वाढदिवस साजरा करत आहे.

सारा  ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करत आहे. तसेच तिने रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपट देखील साइन केला आहे. यामध्ये ती रणवीर सिंह सोबत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)