HBD Sachin Tendulkar : ‘तेंडल्या’ चित्रपटाचा टीझर रिलीज…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आज त्याचा ४५वा वाढदिवस साजरा करतोय. सचिनने ४६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला त्याच्या चाहत्याने चक्क एक चित्रपटच गिफ्ट केला आहे. सचिनला गिफ्ट देण्यात आलेल्या चित्रपटाचे नाव ‘तेंडल्या’ आहे. या चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे.

-Ads-

“आमच्या चित्रपटातील पात्रे अज्याबात काल्पनिक नाहीत, लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय…अख्या ऑल इंडियात जिवंत आसू द्यात की मेलेलं आसू द्या…त्याच्यासंग योगा योगान नव्हं… तर ओढून ताणून आणलं तरी बी संबंध जुळणार नाय ” अशा विनोदी शैलीतील डिस्क्लेमर आणि आबालवृद्धांमध्ये खेळला जाणारा क्रिकेट आणि क्रिकेटवरील प्रेम अतिशय अफलातून पद्धतीने स्वरुपात मांडले असल्याचे ‘तेंडल्या’च्या टीझरमध्ये दिसत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)