#HBD मिलिंद सोमण : जाणून घ्या आर्यन मॅनबद्दल सर्वकाही

फिटनेस फ्रिक , अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण हा ५३ वा वाढदिवस साजरा करतोय या वयाच्या टप्प्यावर ही तो कमालीचा फिट आहे.


राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकणा-या मिलिंदने ‘आर्यन मॅन’चा किताबही जिंकला आहे. मात्र, मिलिंद कधीही जिममध्ये गेलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिलिंदने दिलेल्या मुलाखतीनुसार, तो कधी ही जिममध्ये जात नाही, फिट राहण्यासाठी तो नियमित धावतो. कधीही वेळ मिळाला की तो नुसता धावत सुटतो. पहाटे ५ च्या सुमारास रनिंगसाठी घरातून बाहेर निघतो. रात्री १०.३० वाजता झोपणे तसेच पहाटे ४.३० ला उठणे हा त्यांच्या दिनक्रम आहे. रनिंग शिवाय स्विमींग आणि व्यायामाचे कुठेलही यंत्र न वापरता साधा व्यायाम करतो.

मिलिंदने स्वत:पेक्षा २५ वर्षांनी लहान अंकितासोबत लग्न केले. मिलिंदचे हे दुसरे लग्न आहे. २००६ मध्ये त्याने अभिनेत्री मिलिन जॅम्पेनोईसोबत लग्न केले होते. पण तीन वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)