#HBD Irfan : कधीकाळी वसीम अक्रम सोबत व्हायची ‘इरफान’ची तुलना

भारतीय संघाच्या इतिहासामध्ये अनेक असे सर्वोत्तम गोलंदाज होते, ज्यांनी विरोधी संघाना मैदानावर टिकू दिले नाही. अशा सर्वोत्तम गोलंदाजामुळे बहुतेक सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. भारतीय संघात असाच एक खेळाडू आहे इरफान पठाण.

इरफान पठाण याची तुलना पाकिस्तानचा माजी महान क्रिकेटपटू वसीम अक्रम याच्यासोबत केली जायची. आज म्हणजेच 27 आॅक्टोबरला इरफान पठाण याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल स्टोरी…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इरफान पठाण याचा जन्म 27 आॅक्टोबर 1984 रोजी गुजराजमध्ये झाला होता. आज इरफान त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात प्रथम श्रेणीच्या सामन्यातून केली होती. त्याने 2000 मध्ये बडोदा संघाकडून खेळताना आंध्रा विरूध्द सामना खेळत प्रथम श्रेणीतील सामन्यात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यत 113 प्रथम श्रेणी सामने खेळले असून  365 बळी घेतले आहेत.

इरफानने भारतीय संघासाठी पहिला कसोटी सामना 12 डिसेंबर 2003 मध्ये आॅस्ट्रेलिया विरूध्द खेळला होता. तर 9 जानेवारी 2004 मध्ये आॅस्ट्रेलियाविरूध्द एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इरफान आणि त्याचा भाऊ यूसुफ या दोघांची निवड टी20 विश्वचषक 2007 साठी झाली होती. या दरम्यान इरफान हा विश्वचषकातील सर्व सामन्यात खेळला होता.

इरफान पठाण याच्या परिवारासाठी टी20 विश्वचषकात अंतिम सामन्यात दोघं भावंडांनी खेळणे हा क्षण गौरवाचा होता. या सामन्यात इरफान याने 4 षटकांत 16 धावा देत 3 बळी घेतले होते. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले होते. भारत पहिल्यांदाच पहिला टी20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला होता.

इरफान याच्या नावावर कसोटी सामन्यात हॅट्रीक घेण्याच्या एका खास विक्रमाची नोंद आहे. दरम्यान 2006 मध्ये भारतीय संघ 3 कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली होती. या मालिकेत इरफान याने एका सामन्यात पहिल्याच षटकात शेवटच्या तीन चेंडूवर लागोपाठ 3 बळी घेतले होते. हा हॅट्रीकचा विक्रम इरफानसाठी खास होता, कारण कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅट्रीक घेणारा तो क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला होता.

अष्टपैलू इरफान पठाण याने भारतासाठी आतापर्यंत 29 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये फलदाजीमध्ये 1,105 धावा तर गोलंदाजीमध्ये 100 बळी घेतले आहेत. तर एकूण 120 एकदिवसीय सामने खेळले असून फलंदाजीमध्ये 1,544 धावा तर गोलंदाजी करताना 173 बळी घेतले आहेत. तर टी20 क्रिकेट प्रकारातही इरफानची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 24 सामने खेळले असून फलंदाजीमध्ये 172 धावा तर गोलंदाजीमध्ये 28 बळी घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)